सरस्वती अनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आंबळेतील शंभर निराधारांना ब्लँकेट वाटप

सरस्वती अनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आंबळेतील शंभर निराधारांना ब्लँकेट वाटप

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे गावात सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्था दापोडी यांच्या माध्यमातून कैलासवासी बुद्धप्रकाश देविदास सुरवसे यांच्या स्मरणार्थ गोरगरीब निराधार महिला, अपंग यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

थंडीचा वाढता प्रादुर्भाव पाहता गावातील शंभर गरजवंत लोकांना हे ऊबदार ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आंबळे गावच्या चावडीसमोरील प्रांगणात मोठ्या दिमाखात पार पडला.

कोरोना काळातही सरस्वती अनाथ आश्रम संस्थेच्या माध्यमातुन गावातील जवळपास तीनशे कुटुंबांना किराणा किटही वाटण्यात आले होते.

कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान संस्थेस मिळत नसतानाही संस्थेच्या माध्यमातुन समाजातील गोरगरीब तसेच गरजुंना कायमच मदतीचा हात दिला जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष देविदास सुरवसे यांनी सांगीतले.

गावातील “ती” प्रतिष्ठीत पदाधीकारी व्यक्ती अनुपस्थित : गावातील सर्व सामाजिक कामांमध्ये हिरीरीने पुढाकार घेणारी गावातील प्रतिष्ठीत पदाधिकारी असलेली व्यक्ती नेमकी याच कार्यक्रमाला का उपस्थित नव्हती अशी कुजबुज कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थांमधुन ऐकण्यास मिळाल्याने नेमकी अनुपस्थिति कशामुळे हा प्रश्न ग्रामस्थांना पडला.

या कार्यक्रमासाठी गावचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जगताप यांनी खुप मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास सुरवसे,ताई सुरवसे,संस्थेचे अधीक्षक साठे,सुरवसे सर,गायकवाड सर,तसेच आंबळे ग्रामपंचायतचे सरपंच राजश्री थोरात,मा.सरपंच सुभाष जगताप, पांडुरंग जगताप,सोसायटीचे चेअरमन संजय जगताप,तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार दरेकर,उपाध्यक्ष प्रदिप जताप,नंदकुमार जगताप,किशोर दरेकर,दिलीप जगताप,नंदकुमार जगताप तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *