सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश

अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन

परिषद पदाधिकारी व मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक तोडगा

विज कनेक्शन पुर्ववत करण्याचे दिले आदेश

राज्यात सरपंच वर्गामध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आज(दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ , महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली .या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्ग व सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्त यांच्या वतीने सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे शिष्टमंडळ आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री नितीन राऊत , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटले होते.या शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री संजय शेलार सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री अरुण कापसे ,जिल्हा सचिव श्री शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते.यामुळे सरपंच परिषद मुंबई ही राज्यात आक्रमक झाली होती.त्या आनुशंगाने फक्त सरपंच परिषदेने राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली होती.तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती.यामुळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात गावकर्यांचा व सरपंच परिषदेचा रोष होता.
परंतु आजच्या या बैठकीत
महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणे बाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे. सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने केलेली शिष्टाई व राज्यभरातील परिषदेने सुरू केलेली आंदोलने हे या निर्णयामागे महत्वाचे घटक ठरले.


मंत्री महोदयांच्या निर्णयांचे स्वागत:-

सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्राच्या शिष्टमंडळा बाबत सबंधित विभागाने सकारात्मक चर्चा व निर्णय घेऊन सर्व तोडलेले कनेक्शन पुर्ववत करण्याचे आदेश दिल्या बद्दल सरपंच परिषद सर्वांचे मनपुर्वक आभार मानत आहे.तसेच सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले सरपंच परिषद मुंबई सातारा जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील व त्यांच्या टीम मधील सर्व पदाधिकारी वर्गांचे देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

दत्ता काकडे,प्रदेश अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र


हा तर सरपंचाच्या एकजुटीचा विजय:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ,उर्जा विभागाचे मंत्री नितीन राऊत,सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा व घेतलेले निर्णय आणि दिलेले आदेश म्हनजे राज्यातील सरपंच वर्गाच्या एकजुटीचा व सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा विजय आहे.

अॅड.विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस,सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र

राज्य शासनाने सहकार्याची भुमिका घेतली:-

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ,उर्जा विभागाचे मंत्री नितीन राऊत,सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील या सर्व मंत्री महोदयांनी सरपंच परिषदेच्या मागण्या व ग्रामपंचायतीच्या अडचणी ऐकून दिलेले आदेश महत्वपुर्ण आहेत.
यामुळे पुन्हाअनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे.तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे. या बद्दल मी सरपंच परिषदेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.

नितीनाकाका पाटील,जिल्हा अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई(महाराष्ट्र),सातारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *