बीड
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरपंच तसेच उपसरपंच निवडीवरून दोन गटात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, वादाचे रुपांतर हाणामारी झाले. गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गावात हा धक्कादायक प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सिरसमार्ग गावात जाऊन वाद मिटवला.मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गावात आज सरपंच तसेच उपसरपंच पदाची निवड होणार होती. मात्र निवडीवरून दोन गटात वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.
यावेळी फुटलेल्या सदस्यांना देखील मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सिरसमार्ग लगत असणाऱ्या तरटेवाडी आणि सिरसमार्गच्या ग्रामस्थामध्ये, मारहाण व दगडफेक देखील झाल्याचं सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती समजताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे.दरम्यान सिरसमार्गच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सीमा सुरेश मार्कड यांची बिनविरोध निवड झाली. तर नवनिर्वाचित सरपंचाने मतदान केल्याने, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सौ.मेघाताई अनिल पवळ यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांचा उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाला. सिरसमार्ग ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे ६ तर भाजपाचे ५ सदस्य आहेत.