पुरंदर
पुर्ण देशामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा होत असतानाच महात्मा फुल्यांच्या खानवडी गावात संविधान दिन साजरा केला गेला नाही.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांनी आदेश काढुनही त्यांच्या आदेशाला ग्रामसेवक अनिल जगताप यांनी केराची टोपली दाखवली.
ज्या संविधान निर्मात्याने 395 कलमांची राज्यघटना लिहून आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण केली त्या महात्मा फुल्यांच्या गावी संविधान दिन साजरा केला गेला नाही.त्यामुळे संपूर्ण बहुजन समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
विशेष म्हणजे या ग्रामसेवक याने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या गावात म्हणजे एखातपुर मुंजवडी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा संविधान दिन साजरा केला नाही.खानवडी ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच असलेले स्वप्नील होले हे वकील आहेत.
आणि ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे अशी व्यक्तीला संविधान दिन माहीत नसणे किंवा महात्मा फुल्यांच्या गावात संविधान दिन साजरा करत नाहीत? ही कोणती मनुवादी मानसिकता म्हणायची?
खानवडी ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक जातीयवादी मानसिकतेतून संविधान दिन साजरा केला केला नाही.ग्रामसेवक अनिल जगताप यांनी माहिती असून जाणीवपूर्वक संविधान दिन साजरा केला नाही.
संविधानाचा तो अवमान आहे.त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे असे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी संजीवनी न्युजशी बोलताना मत व्यक्त केले.