शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय !!!!! इच्छुकांचा भ्रमनिरास ; महापालिका आणि जि.प.सदस्यांच्या संख्येत बदल,जि.प.निवडणुक आणखी रखडणार

शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय !!!!! इच्छुकांचा भ्रमनिरास ; महापालिका आणि जि.प.सदस्यांच्या संख्येत बदल,जि.प.निवडणुक आणखी रखडणार

मुंबई

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद मधील सदस्यांच्या संख्या घटवणेचा निर्णय आज घेतला आहे. त्यामुळे पूर्ण तयार झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणखी लांबीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गट आणि गनांची संख्या वाढवली होती .ती रद्द करून ती पुन्हा 2017 प्रमाणे करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मध्ये मतदारसंघ निश्चित होऊन आरक्षण सोडतही गेल्या आठवड्यात पार पडली होती.

आता पुन्हा नव्याने सगळा खटाव निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णय बदलण्याचा सपाटाच लावला आहे.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार असं वाटत असतानाच हा नवीन निर्णय आल्याने इच्छुकांची मात्र निराशा झाली आहे .

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 50 ते 75 करण्याचा नवा निर्णय या सरकारकडून घेण्यात येतोय. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये याचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *