पुणे
महाराष्ट्र असो किंवा देश शरद पवार हे नाव माहिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 12 डिसेंबर 2022 वाढदिवस…वयाची ऐंशी ओलंडल्यानंतरही पवार आज राज्याच्याच नव्हेत तर देशाच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय आहेत.
‘काटेवाडी ते संसद’ असा या महान नेत्याचा प्रवास…82 पावसाळे पाहिलेला योद्धा असा राजकारणात त्यांचा उल्लेख होतो.पावसाळा म्हटला की त्यांची इतिहासिक भाषणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

शरद पवार यांना गौरवशाली राजकीय कारकिर्दीतील 55 वर्षांचा अनुभव आहे, म्हणून त्यांना विचारपीठ असंही म्हटलं जातं. म्हणून जेव्हा हा विचारपीठ मैदानात उतरतो तेव्हा भलेभले राजकीय नेते चक्रावून जातात.
राजकीय मैदानात त्यांचे अनेक रुप सर्वसामान्य जनतेला कायम दिसतं असतात. नुकताच T20 वर्ल्डकप दरम्यान त्यांचं क्रिकेटप्रेमी शरद पवारांचं खास रुप दिसलं.जेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात वचपा काढला तेव्हा शरद पवारांचं विजयी सेलिब्रेशन व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर या वयातही त्यांची उर्जा पाहून नेत्यांपासून सर्वसामन्य लोक अवाक् झाले.
एक एक कणा कणात उर्जेने भरलेले शरद पवार यांचं एक अजून रुप दिसलं ते साताऱ्यात…2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले होते. या सभेत पवारांचं अनोखं रुप देशाला पाहिला मिळालं. त्यावेळी राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपली सभा रद्द केली होती.
पण राजकारणातील पैलवान रात्रीच्या अंधारात आणि भरपावसात विचारपीठ यांनी पावसातील भाषण ऐतिहासिक ठरवलं.पवारसाहेबांनी, सातारकरांची नाळ ओळखून भिजतच उपस्थितांना शाब्दिक सल्ले दिले.
पावसाचे थेंब आणि पवारसाहेबांनी दिलेला सल्ला अनेकांना पटला. त्यातून इतिहास घडला. अशा या शरद पवारांचा कॉलेज जीएसपासून ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.