पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टेकवडी गावच्या खांडगे वस्ती वरील नागरिक सहा महिन्यापासून सिंगल फेज वीज रोहित्र मिळविण्यासाठी धडपड करत आहेत.मात्र महावितरण कडून वारंवार मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
टेकवडी(तालुका पुरंदर)येथील पन्नास कुटुंब संख्या आलेल्या खांडगे वस्ती येथे गेल्या सहा महिन्यांपासून विजेचा प्रश्न भेडसावत आहे.मागील अनेक दिवसा पासून नागरिकांना लाइट च्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,लाईट बिल भरून सुद्धा घरातील फ्रीज, पंखे, टीव्ही इत्यादी उपकरणे योग्य प्रकारे चालत नाही.
उन्हाच्या तीव्रतेमुळे घरात गर्मी वाढली आहे फॅन,कुलर चा उपयोग करावा लागतो आहे.मात्र वीज उपलब्ध होत नाही.यामुळे गरमित रात्र काढावी लागते.वीजबिल वेळेवर भरावे लागते मात्र वीज वेळेवर मिळत नाही अशी अवस्था खांडगे वस्ती ग्रामस्थांची झाली आहे.
ग्रामपंचायत व वस्तीवरील ग्रामस्थांनी महावितरणकडे सहा महिन्यापूर्वी नवीन सिंगल फेज वीज रोहित्र मिळावे यासाठी मागणी केली आहे.कॉन्ट्रॅक्टरांचा संप सुरू असल्याचे कारण महावितरण दोन महिन्यापासून सांगत आहे.
सिंगल फेज विद्युत तोहित्रची पूर्तता न झाल्यास खांडगे वस्ती ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवराज इंदलकर यांनी सांगितले आहे.याबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
👍👍👌