वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन “या” तलाठ्याने घेतला गळफास

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन “या” तलाठ्याने घेतला गळफास

सातारा

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन तलाठ्याने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लक्ष्मण बोराटे असे आत्महत्या करणार्या तलाठ्याचे नाव आहे.लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपुर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीतील आरोपांची चौकशी होणार का? हेच महत्वाचे आहे.

लक्ष्मण बोराटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

आम्ही सर्व विषयात कार्यवाही करु असे पोलिसांनी समजुन सांगीतल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण यांनी त्यांच्या चिठ्ठीत अन्याय करणार्या वरिष्ठांबाबत लिहिले असल्याचे सांगीतले.

यामध्ये महसुल विभाग, तलाठी कार्यालयातील अधिकारी व सहकारी तसेच तलाठी संघटनेचे नाव असल्याचा संशय आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *