मुंबई
या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांनी दिवाळीसाठी उपयुक्त असणारा रवा, चणाडाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिका धारकांच्याफायद्याचा आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूंचे पॅकेज मिळणार आहे.त्यामुळे सरकारकडून खास दिवाळी भेट मिळाली आहे. राज्य सरकारच्या आज मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.