राज्यभरातील भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,००० मिळणार;जाणून घ्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?

राज्यभरातील भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,००० मिळणार;जाणून घ्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?

पुणे

यावर्षीपासून प्रथमच महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे.यानिमित्ताने राज्यभरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचा अनुभव देण्यासाठी विविध आंतरराष्ट्रिय आणि स्थानिक स्तरावरील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यातील सांस्कृतिक वारसा आणि भक्तिसंस्कृती जपण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरला आहे. राज्यातील लोकसंस्कृतीचा प्रसार आणि संप्रेषण वाढवण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.याचाच एक भाग म्हणून राज्यातील भजनी मंडळांसाठी विशेष भांडवली अनुदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातील 1,800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी रु. 25,000/- अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान भजनी मंडळांच्या भजनकार्याला गती देण्यासाठी तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक प्रभावी पद्धतीने करता यावे, यासाठी राबवण्यात आले आहे.

या माध्यमातून राज्यभरातील भजनी मंडळांना आपले कार्य सुलभ व प्रभावी करण्याची संधी मिळणार आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की,”भजनी मंडळांनी या अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. राज्यातील प्रत्येक भजनी मंडळ आपल्या कार्यासाठी या संधीचा लाभ घेऊ शकेल. हे अनुदान भजनी मंडळांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच आपल्या कार्यक्रमांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

”अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑगस्ट,2025 पासून सुरू होऊन 6 सप्टेंबर,2025 पर्यंत चालणार आहे. इच्छुक मंडळे या अर्जांसाठी https://mahaanudan.org या अधिकृत वेबपोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करताना मंडळाची माहिती, भजनकार्याचे स्वरूप, भांडवली गरज याबाबत योग्य तपशील भरावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *