राजकारण तापणार ??? कालच्या “या” ठिकाणच्या दसरा मेळाव्यात दारुच्या बाटल्या वाटल्या? आणि “ती” सोयही होती?

राजकारण तापणार ??? कालच्या “या” ठिकाणच्या दसरा मेळाव्यात दारुच्या बाटल्या वाटल्या? आणि “ती” सोयही होती?

मुंबई

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यावरुन खळबळजनक आरोप केला आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर तिथे दारुच्या बाटल्या आढळून आल्याचं कचऱ्यात दिसून आलं आहे, असं पेडणेकर यांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर दारु होती तर त्याच्यासोबत लागणारी ‘ती’ गोष्टीही तिथे होती का?अशी शंका किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केली आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय, की त्या विद्यापीठात दारुच्या बाटल्या, नको नको ते… जे दिसायला नाही पाहिजे, जे डिसॉल्व्ह होणं अति गरजेचं आहे, ते सगळं तिथे पडलेलं होतं. मी महिला आहे, मी ते शब्द वापरु इच्छित नाही. नको ती वस्तू ती पण तिथे पडली होती. ‘ती’ पण सोय तिथे केली होती का? आणि जर केली होती, तर त्यावर कडक कारवाई तुम्ही करा! कारण दारुच्या बरोबर बाकीपण जे लागतं ‘ते’ पण तिथं होतं. ते होतं तर ‘ते’ दुसरंही होतं, असं भासवलं जातंय त्या कचऱ्यावरुन. बीकेसी मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळव्यानंतर जो कचरा जमा झाला होता, त्यावरुनही किशोरी पेडणेकरांनी हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की…त्या कचऱ्याला बघून आयोजकांवर कारवाई करणार की नाही? कारवाई केली पाहिजे, असं आमचंही मत आहे. तो मेळावा जर विचारांचा होता, तर त्या मेळाव्यात ही गल्लत कशी झाली?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी थेट दुसरा दसार मेळावा बीकेसीत घेतला होता. आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा बीकेसीत घेण्यात आलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातून करण्यात आला. या मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या नेत्यांनी टीका केलीय मेळाव्यानंतर निदर्शनास आलेल्या बाबींवर शिंदे गटावर निशाणा साधला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *