पुरंदर
राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम ला धरून आज दिनांक ३१/१०/२०२१ रोजी मौजे गुरोळी ता.पुरंदर भैरवनाथ सभाग्रुह् मध्ये युवा सारथी फॉउंडेशन ने ग्रामपंचायत गुरोळी च्या वतीने,किशोर वयीन मुली आणी पालकत्व,या विषयावर मार्गदर्शन केले.
यामध्ये आई आणी मुलीचे नातेसंबंध कसे असावेत आणी हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे शरीरावर आणी मनावर काय परिणाम होतात आणी ते परिणाम होऊ नयेत म्हणून आहार विहार कसा असावा यावर महिला आणी मुली सोबत सविस्तर मार्गदर्शन संस्थेचे महिला विषयी चे मार्गदर्शक सौ.सारिकाताई खोपडे यांनी केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत गुरोळी चे सरपंच सौ.जाधव ताई व उपसरपंच श्री.मधुकर काका खेडेकर उपस्थित होते.तसेच इतर ग्रामस्थ महिला पुरुष उपस्थित होते.याविषयी संस्थेचे कार्याध्यक्ष कु.अभिषेक पांडुरग पवार यांनी प्रस्ताविक मांडले,व सरपंच यांनी संस्थेचे आणी ग्रामस्थांचे आभार मानले व जास्तीत जास्त महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी सूचना केली.
सदर् कार्यक्रम आता मोठ्या स्वरूपात गावातील शाळेमध्ये घेऊन जास्त प्रमाणात जनजागृती करू असे श्री.मधुकर काका खेडेकर यांनी भूमिका मांडली.व युवा सारथी फौंडेशन चे आभार माणून गावात या पुढे विविध कार्यक्रम घ्यावेत अशी विनंती केली.