पुणे
पोलिस दल , रेल्वे संरक्षण दल या सरकारी नोकऱ्यांमध्ये
दिव्यांगाणा देण्यात येणारा ४ टक्के आरक्षण कोटा केंद्र सरकारने नुकताच रद्द केल्याने दींव्यांग बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली असून मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग आयुक्त कार्यालया समोर दिव्यांग बांधवांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून एका तराजू पारड्या मध्ये पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा व दुसऱ्या तराजू पारड्यात रक्ताच्या पिशव्या ठेऊन रक्त तुला करण्यात आली.
रक्त घ्या पण आरक्षण द्या ,दिव्यांग एकजुटीचा विजय असो.दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करा. विविध घोषनानी संपूर्ण परिसर दणाणून टाकला होता धर्मेंद्र सातव यांच्या सयमी व कल्पक विचारातून या अनोख्या आंदोलनाची आयुक्तांनी दाखल घेत दिव्यांग कल्याण उपा युक्त संजय कदम यांनी दींव्यांग बांधवांचे निवेदन स्विकारले आहे.या अनोख्या आदोलनाची चर्चा दिवसभर शासकिय कार्यालयात सुरू होती.
सुरेखा ढवळे,अनिल मेमाने,सुप्रिया लोखंडे,बाबा पाडुळे, सुरेश पाटील,अनिता कांबळे, अनिता कदम ,संजय चव्हाण , शिवाजी शिंदे,जीवन टोपे,नामदेव दगडे , दशरथ शिंदे ,रफीक खान,बाळू काळभोर,नंदू कोळेकर,आनंद गायकवाड़, दिपा वाघमोडे व इतर दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.