पुणे
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 13 पंचायत समित्यांच्या सभापती पदाची सन 2025 ची आरक्षण सोडत नुकतीच निश्चित करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या हवेली पंचायत समितीचे सभापती पद यंदा सर्वसाधारण वर्गाकडे जाणार आहेत.
तर पुरंदर तालुका सभापतिपद नागरिकांच्या मागासवर्गासाठी आहे.
पंचायत समिती निहाय सभापती पदासाठी निश्चित झालेले आरक्षण पुढील प्रमाणे आहे. हवेली – सर्वसाधारण, इंदापूर – अनुसूचित जाती, जुन्नर- अनुसूचित जमाती महिला, दौंड- नागरीकांचा मागासवर्ग, पुरंदर- नागरीकांचा मागासवर्ग, शिरुर- नागरीकांचा मागासवर्ग महिला, मावळ- नागरीकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे- सर्वसाधारण महिला, मुळशी- सर्वसाधारण महिला, भोर- सर्वसाधारण महिला, खेड- सर्वसाधारण महिला, बारामती- सर्वसाधारण, आंबेगांव- सर्वसाधारण अशी जिल्ह्यातील पंचायत समित्यांची आरक्षण सोडत झाली आहे.