मी पूर्ण कपड्यात फिरते,बाकीच्यांचं मला माहित नाही;उर्फी वादात आता “या” बड्या महिला नेत्याची उडी

मी पूर्ण कपड्यात फिरते,बाकीच्यांचं मला माहित नाही;उर्फी वादात आता “या” बड्या महिला नेत्याची उडी

मुंबई

उर्फी जावेद आणि तिच्या कापडयांवरून चालू असलेला वाद आता नवीन राहिलेला नाही. चित्रा वाघ यांनी सुरू केलेल्या या वादात काही राजकीय महिला नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी उर्फीला विरोध केला, तर काहींनी तिला पाठिंबा दिला.

उर्फीच्या अंगप्रदर्शन प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कळंबोलीमध्ये आयोजित कळंबोली चषक स्पर्धेला हजेरी हजेरी लावली होती.

यावेळी माध्यमांनी शर्मिला ठाकरे यांना उर्फी जावेद वाद प्रकरणी विचारले असता मिश्किल टोला लगावत त्या म्हणाल्या की, ‘मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचं मला माहित नाही.’ शर्मिला ठाकरे यांनी उर्फीला मारलेल्या मार्मिक टोल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *