“मी गाढव आहे,मी इथे कचरा टाकतो/ टाकते” !!!!! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकुन अस्वच्छता पसरविणार्यांसाठी पुरंदरमधील “या” ग्रामापंचायतीने लावले अशा प्रकारचे फलक

“मी गाढव आहे,मी इथे कचरा टाकतो/ टाकते” !!!!! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकुन अस्वच्छता पसरविणार्यांसाठी पुरंदरमधील “या” ग्रामापंचायतीने लावले अशा प्रकारचे फलक

पुरंदर

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून गावामध्ये अस्वच्छता पसरू नये म्हणून नीरा ग्रामपंचायतीच्या अनेक प्रयत्न केले जातात.मात्र काही लोक या प्रयत्नांना कोणती कोणतीच दाद देत नाहीत. वेळेवर  घंटागाडी येत नसल्याचे कारण देत रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकत आहेत.

यावर उपाय म्हणून नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने  कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या ठिकाणी  ‘ मी  गाढव आहे,मी इथे कचरा टाकतो/ टाकते ‘ अशा प्रकारचे बोर्ड लावले आहेत. ग्रामपंचायतीच्या या कारवाईने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाना मोठा वेग आला आहे.सध्यातरी ग्रामपंचायतीने लावलेल्या बोर्डाचे गग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

पुरंदर तालुक्यातील नीरा ग्राम पंचायतीने १० वर्ष पुर्वीच ‘स्वच्छ नीरा,सुंदर नीरा’ असा नारा दिला. यासाठी प्रथम उघडी गटारे बंद करून ती अंतर्गत करण्यात आली. कचरा कुंड्या उचलण्यात आल्या.आणि लोकांचा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्द करून देण्यात आली. मात्र तरी देखील लोक सार्वजनिक ठिकाणी घरातील कचरा आणून टाकत आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्या ठिकाणी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कचरा टाकणाऱ्या  लोकांना प्रथम समज दिली जाईल. त्यानंतरही काचरा टाकल्यास त्या व्यक्तींचे फोटोच  त्या ठिकाणी लावले जातील.  कचरा साफ करणे सोपे आहे.मात्र कचराच होऊ न देणे खूप अवघड काम आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य केले तर ते सहज शक्य आहे : राजेश काकडे,उपसरपंच,नीरा

काल एका कार्यक्रमात नीरेच्या  सरपंच तेजश्री काकडे म्हणाल्या होत्या की, सार्वजनिक स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यासाठीं  सर्वच नागरिकांनी जबाबदारीने वागायला हवे यानंतर आज नीरेत ज्या ठिकाणी लोक कचरा आणून टाकतात.

त्या ठिकाणी ग्रामपंचायतिच्यावतीने “मी गाढव आहे मी इथे कचरा टाकतो/ टाकते” अशा प्रकारचे बोर्ड लावले आहेत. आता ग्रामपंचायतीच्या या कारवाई नंतरही लोक त्या ठिकाणी कचरा टाकतात का हे पाहणे औतुक्याचे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *