माळशिरसमधील ह्रदयद्रावक घटना! नवीन संसाराची अधुरी कहाणी,सात जन्माची गाठ दुसर्‍याच दिवशी सुटली;नववधुच्या मृत्युने कुटुंबावर द:खाचा डोंगर…..

माळशिरसमधील ह्रदयद्रावक घटना! नवीन संसाराची अधुरी कहाणी,सात जन्माची गाठ दुसर्‍याच दिवशी सुटली;नववधुच्या मृत्युने कुटुंबावर द:खाचा डोंगर…..

पुणे

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बाभुळगावात ह्रदयद्रावक घटना घडली आहे.सात जन्माची साथ देण्याच वचन बांधल्यानंतर अवघ्या २४ तासात नववधुनं जगाचा निरोप घेतला.या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे. १३ मे रोजी तिचं लग्न झालं आणि १४ मे रोजी तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, समीर हरिदास पराडे या तरुणाचं १३ मे रोजी जानकीशी लग्न झालं होतं.

जानकी माढा तालुक्यातल्या घोटी गावची होती. नीरा नरसिंहपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचं समीर पराडे याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला नातेवाईक, गावकरी आणि मित्र परिवारही उपस्थित होता. नववधू जानकीने सासरी गृहप्रवेशही केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या छातीत वेदना होऊ लागल्या. कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र अकलूजमधील खासगी रुग्णालयातच नेण्याआधी वाटेतच तिचा मृत्यू झाला. जानकीच्या निधनामुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सासरी आलेल्या नववधूच्या अशा अकाली जाण्याने बाभूळगाव गावात शोककळा पसरली असून, अंत्यसंस्कार गावात शोकपूर्ण वातावरणात पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा अनर्थ घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नात्यांची गुंफण सुरू होण्याआधीच काळाने ती तोडल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *