मानव संरक्षण समिती नवी दिल्ली सोलापूर जिल्हा विभाग ,आर्ट ऑफ लिविंग आणि अकलूज ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने मदत

मानव संरक्षण समिती नवी दिल्ली सोलापूर जिल्हा विभाग ,आर्ट ऑफ लिविंग आणि अकलूज ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने मदत

अकलुज

मानव संरक्षण समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे यांच्या सूचनेनुसार मा श्री जी एम भगत महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना एक हात मदतीचा
सोलापूर जिल्हा महिला जनसंपर्क अधिकारी सुहासना बागीहळ्ळीकर यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा सर्व पदाधिकारी, माळशिरस तालुका सर्व पदाधिकारी,आर्ट ऑफ लिविंग सर्व साधक,आणि अकलूज ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पुरग्रस्तांना मदत पोहोच करण्यात आली.

कोरोना काळात दवाखान्यात ऍडमिट असणाऱ्या कोरोनाग्रस्त पेशंटच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांना जेवणासह इतर मदत करणाऱ्या मानव संरक्षण समिती नवी दिल्ली यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा म्हणत पुढाकार घेतला पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि नवीन कपड्यांच्या स्वरूपात अकलूज मधून एक लाख रुपये किमतीच्या वस्तूंची मदत केली आहे कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा दणका बसला.

या पार्श्वभूमीवर रायगड च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देत मानव संरक्षण समिती नवी दिल्ली सोलापूर जिल्हा विभाग ,आर्ट ऑफ लिविंग आणि समस्त ग्रामस्थ यांनी नविन कपडे आणि मीठा पासून ताटा पर्यंत वस्तूंची मदत पोहचवली पूरग्रस्तांना सहाय्यता सामुग्री मध्ये पैक केलेले अन्न, ब्लॅंकेट ,महिलांसाठी साड्या, मुला मुलींचे नवीन कपडे ,बेडशीट, सुका खाऊ, पाणी बॉटल बॉक्स ,स्वयंपाकाची भांडी, बादली, मग अशा कुटुंबाला जीवन उपयोगी वस्तू पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत म्हणून देण्यात आल्या.

यासाठी अकलुज मधील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले मदत नव्हे कर्तव्य या भावनेने दात्यांनी दिलेल्या योगदानातून अकलूज मधून पूरग्रस्तांसाठी साधारण एक लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या साहित्य घेऊन निघालेल्या बसची आदरणीय सौ शीतल देवी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर बस तळीये तालुका महाड जिल्हा रायगड कडे रवाना झाली पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी अकलूजच्या महिलांनी पुढाकार घेतला.

सौ वनिता कोरटकर महिला उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा,हेमलता मुऴीक सह निरीक्षक सोलापूर जिल्हा प्रिया नागणे सह संघटक सोलापूर जिल्हाश्री गोरख डांगे शिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग
शंभू कचरे यशवंत करिअर फोरम अकलूज
राजीव बनकर ,आर्ट ऑफ लिविंग
सीमा एकतपुरे माळशिरस तालुका अध्यक्ष
कविता शेंडगे माळशिरस तालुका सचिव
नीता देशमुख सदस्या यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *