महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पुरंदरमधील “या” गावात विविध उपक्रमांनी साजरा

महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पुरंदरमधील “या” गावात विविध उपक्रमांनी साजरा

पुरंदर

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्ष नेते मा श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गिय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान सासवड व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गुरोळी व पुरंदर ता.राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस यांच्या संयुक्त विध्यमाने जि.प.प्रा.शाळा गुरोळी व जाधववाडी येथील जवळपास ९३ विध्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संतोषकाका जगताप श्री सनी जगताप गुरोळी गावचे मा.सरपंच रामगुरुजी खेडेकर पंचायत समितीच्या मा सभापती गौरीताई कुंजीर सुमित लवांडे पुरंदर ता.राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस अध्यक्षा सौ.सोनाली खेडेकर माजी सैनिक राजाराम खेडेकर सिद्धनाथ खेडेकर अमित खेडेकर मनोहर खेडेकर विलास खेडेकर तसेच पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी श्री रामगुरुजी खेडेकर यांनी एकनाथकाका ट्रस्ट हे नेमहीच समाजातील विविध घटकांसाठी उपक्रम राबवते तसेच कोरोना काळातही संपुर्ण पुरंदर तालुक्यात किराना किट वाटण्याचे मौल्यवान काम केले आहे असे मनोगत व्यक्त करुन ट्रस्टचे आभार मानले

सदर कार्यक्रमास ॲड.गौरीताई कुंजीर मा,सभापती पुरंदर,संतोषशेठ जगताप,वाशी मार्केट चे दलाल शांतारामशेठ खेडेकर, मा,सरपंच रामगुरुजी खेडेकर,विद्यमान उपसरपंच मधुकाका खेडेकर,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सिद्धनाथ तात्या खेडेकर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुमित नाना लवांडे,युवा कार्यकर्ते राजन उरसळ,अमित खेडेकर,राजेंद्र खेडेकर फौजी,अनंत खेडेकर,मनोहर खेडेकर व शिक्षक वृंद गुरोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *