महाराष्ट्रातील “या” बड्या मंदिर दरबारी सुरक्षारक्षक आणि भक्तांमध्ये तुंबळ हाणामारी

महाराष्ट्रातील “या” बड्या मंदिर दरबारी सुरक्षारक्षक आणि भक्तांमध्ये तुंबळ हाणामारी

पुणे

साई मंदिराचे सुरक्षारक्षक आणि साई भक्तांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. भक्ताच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तर साईसंस्थानच्या सुरक्षारक्षकांना भक्तांना मारहाण न करण्याची तंबी पोलिसांनी दिली आहे. मात्र साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीची घटना घडल्याने साईबाबांच्या शिकवणीचा विसर पडलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबईहून शिर्डीत रामनवमीच्या निमित्ताने पायी पालखी घेऊन येणारे साईभक्त आणि सुरक्षारक्षकांमध्ये आज मारहाणीची घटना घडली आहे. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताला आपली पिशवी आत राहिल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा पाच नंबर गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र सुरक्षारक्षकांनी मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाच नंबर गेट समोरच सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकरणी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *