मन सुन्न करणारी घटना !!!!!!               दहा वर्षांनी झालेल्या बाळाचं बारसं करून पुण्याला निघाले,मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओनं उडवलं;चौघांचा दुदैवी मृत्यू

मन सुन्न करणारी घटना !!!!!! दहा वर्षांनी झालेल्या बाळाचं बारसं करून पुण्याला निघाले,मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओनं उडवलं;चौघांचा दुदैवी मृत्यू

पुणे

ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेने छत्रपती संभाजीनगर  हादरले आहे. दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली.

दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून कुटुंब पुण्याकडे जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले.

या अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत. विशाल चव्हाण नावाच्या ड्रायव्हरने कृष्णा केरे याला गाडी चालवायचं लायसन नसताना गाडी चालवण्यास दिली.

कृष्णा केरे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *