पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीतुन मकरसंक्रांतीच्या दिवशी एका सतरा वर्षीय मुलीस पळवुन नेल्याची तक्रार तिचे वडील वय 45 वर्षे व्यवसाय – शेळी पालन रा.सुकलवाडी(वाल्हे) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
मुलीचे वर्णन
वय 17 वर्षे, उंची 5 फुट 1 इंच,रंग – गोरा,चेहरा-गोल,डोकीस-काळे केस,कानात – बेन्टीक्सच्या रिंगा,नेसणीस – चॉकलेटी कलरची लाँग फ्रॉक,पायात- गुलाबी रंगाचा सॅन्डल या प्रमाणे वर्णन आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.14/01/2025 रोजी दुपारी 03:30 ते 04:00 वाजताचे सुमारास मौजे सुकलवाडी(वाल्हे) ता.पुरंदर जि.पुणे येथुन माझी मुलगी वय 17 वर्षे हिस कोणीतरी अज्ञात इसमाने कषाची तरी फुस लावुन माझ्या कायदेषीर रखवालीतुन बळजबरीने पळवुन नेलेले आहे तरी त्या अज्ञात इसमा विरूध्द तिच्या वडिलांनी कायदेषीर फिर्याद दिली आहे.
पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. नांगरे करित आहेत.