मंत्री असुन साध आमदार नाही झालात,बापु आधी आमदार तर व्हा, लोकसभेच्या कुठ नादी लागता; लोकसभेला डिपॉझीटच जप्त करणार : सचिन दरेकर

मंत्री असुन साध आमदार नाही झालात,बापु आधी आमदार तर व्हा, लोकसभेच्या कुठ नादी लागता; लोकसभेला डिपॉझीटच जप्त करणार : सचिन दरेकर

पुरंदर

जनतेने संधी दिली तर बारामती लोकसभेची निवडणुक राष्ट्रवादी कॉंगेसच्या विरोधात म्हणजेच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार असल्याचे सुतोवाच महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलेले आहेत.

या भुमिकेवर तालुक्यातुन बरेच राजकारणी सध्या आपली भुमिका मांडताना दिसत आहेत यातच आंबळे गावचे उपसरपंच यानी आपली भुमीका मांडली आहे.

ज्यावेळी कोरोनाचे सावट संपुर्ण जगावर होते, पुरंदर तालुक्यातही भयानक परिस्थिति होती त्यावेळी बापु आपण कुठे होता अन आता निवडणुकीच्याच तोंडावर आपणास विकासाचा साक्षात्कार झालाय का? : सचिन दरेकर, उपसरपंच,आंबळे

संजीवनी न्युजशी बोलताना उपसरपंच सचिन दरेकर म्हणाले की ज्या माणसाला मंत्री असुन आमदारकीपण टिकवता येत नाही त्या माणसाने खासदार होण्याची स्वप्ने पाहु नयेत.

तुम्ही जर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढवण्यास ईच्छुक असाल तर आम्हाला देखील आनंदच होईल पण तुमच डिपॉझीट नक्कीच जप्त होणार ही खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *