सातारा
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरोगामी विचाराचा पगडा असलेल्या आणि थोर विचारवंतांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात एका 11 वर्षांच्या मुलीसोबत अघोरी प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
अवघ्या अकरा वर्षाच्या मुलीला कुंकू आणि मळवट भरलेला आहे. तिच्या मांडीवर कोंबडी ठेवलेला आहे आणि तिच्यावर मांत्रिक वेगवेगळे अघोरी प्रकार करत असल्याचे हे चित्र आहे. हा सगळा सातारा जिल्ह्यातील सुरूर इथं धावजी पाटील बुवा या देवस्थानाजवळ असलेल्या चक्क स्मशानभूमीत घडला आहे. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्याच जिल्ह्यातलं हे चित्र मन विचलित करणारे आहे.
हे कुटुंब आहे पुण्यातील हडपसर या भागातील राहणार आहे. मुलीला लागलेली लागण ही उतरवायचे आहे म्हणून पुण्यातील मांत्रिकाने या कुटुंबाला घेऊन धावजी पाटील या ठिकाणी काल दाखल झालं. देवाचं दर्शन घेतलं.
या मांत्रिकानं या कुटुंबाला वाईच्या कृष्णा नदीवर घेऊन या मुलीला आंघोळ घातली. धावजी पाटील या ठिकाणी आल्यावर त्यानं हिचे कपडे बदलायला लावले आणि या अघोरी प्रकारासाठी बसवलं. स्मशानभूमीत पूजा-अर्चा सुरू असताना एका सुशिक्षित युवकाने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर पाठवला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.