पुरंदर
मुंबई हैदराबाद हाय स्पीड रेल काॅरीडाॅर साठी जमीन देण्यास पुरंदर तालुक्यातील वाघापुर येथील शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे वाघापुर येथे शेतकऱ्यांनी बैठकीत एकमुखाने जमीन देण्यास तीव्र विरोध केला आहे.
यावेळी वाघापूर येथील कुंजीरस्थळ येथील शेतकऱ्यांशी बोलणी करण्यासाठी तसेच डी पी आर तयार करण्यासाठी दिल्ली येथील रेल्वे विभागाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जमिनी देण्याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
यावेळी उपसरपंच सौरभ कुंजीर सोसायटी माजी अध्यक्ष बाजीराव कुंजीर , माजी केंद्रप्रमुख अशोक कुंजीर ,नितीन कुंजीर, उदय कुंजीर ,पोलीस पाटील विजय कुंजीर, शिवसेनेचे मनोज कुंजीर यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.