बारामती मतदारसंघातील “या” गावात शर्यतीदरम्यान बैल उधळले अन् गाडा थेट गर्दीत शिरला; धडक बसताच वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

बारामती मतदारसंघातील “या” गावात शर्यतीदरम्यान बैल उधळले अन् गाडा थेट गर्दीत शिरला; धडक बसताच वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

पुणे

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बैलाचा धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली. विष्णू गेनबा भोमे (वय ७०) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. भोमे हे शिंद गावातील रहिवासी होते. बैलाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

रामनवमी आणि जनाई देवी यात्रा उत्सवानिमित्त भोर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे हे शर्यत पाहण्यासाठी भोर येथे आले होते. भोमे यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती.एकेकाळी त्यांच्याकडे शर्यतीचा बैल होता. दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक बैल उधळून भोमे यांच्या दिशेने आला.

काही कळण्याच्या आत बैलगाड्याची त्यांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये भोमे गंभीर जखमी झालेत्यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं.

प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी भोमे यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र, उपचार सुरु असताना भोमे यांच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *