पुरंदर
दिनांक २१.०७.२०२३ रोजी रात्री ०७.३० ते ०८.०० वा. चे सुमारास मौजे पिपरे गावचे हदीत बेंदवस्तीकडे जाणारे रोडलगत कॅनॉलच्या बाजुला इसम हरीशचंद्र बजरंग थोपटे वय ४२ वर्षे रा. बेदवस्ती पिंपरे खुर्द ता. पुरंदर जि.पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणामुळे धारदार शस्त्राने कपाळावर, गालावर, हनगुटीवर, गळ्यावर वार करून जीवे ठार मारले आहे. त्याबाबत मयताचा भाउ सतिश बजरंग थोपटे यांनी तक्रार दिलेवरून जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.न ३३२ / २०२३ भादवि ३०२ अन्वये आज रोजी गुन्हा दाखल करण्यात आला
सदर गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे तपासात गोपनीय बातमीदाराच्या आधारे माहीती काढुन इसम नामे १) प्रणव ढावरे रा. पाडेगाव ता. खंडाळा जि सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी करता त्याने व गुन्हयातील मयत याची पत्नी २) पुजा हरीशचंद्र थोपटे हीचे मदतीने आरोपी ३) धीरज उर्फ बंटी संजय ढावरे ४) निकेश विरेंद्रसिंह ठाकुर र हिवरकरमळा सासवड व त्याचे इतर साथीदार ५) सिध्दात संभाजी भोसले रा जेजुरी लवथळेश्वर, ६) सुरेश कांतीलाल कडाळे रा पाडेगाव फार्म ता. खंडाळा ७) लखन सुर्यवंशी याचेसोबत कट रचुन खुन करण्याची सुपारी देवुन, मयत हरीशचंद्र बजरंग थोपटे वय ४२ वर्षे रा. बेदवस्ती पिंपरे खुर्द ता. पुरंदर जि.पुणे याचा खुन केला त्यांना सदर गुन्हा करताना त्याचे साथीदार स्वरूप रामदास जाधव विशाल चव्हाण, शुभम मचारे यांनी मदत केलेचे निष्पन्न झालेने, वरील सर्व आरोपींनी गुन्हयाचे कामी ताब्यात घेणेत आले असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री अंकित गोयल, .पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रा., आनंद भोईटे, मा. अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती याचे मागर्दर्शनाखाली, तानाजी बरडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड याचे सुचनेप्रमाणे, जेजुरी पोलीस स्टेशनकडील बापुसाहेब सांडभोर, पोलीस निरीक्षक, एन.एच. सोनवलकर पोलीस उपनिरीक्षक, रूपाली पवार म.पोलीस उपनिरीक्षक, पी.एम.गावडे पोलीस उपनिरीक्षक, आर. एम. साबळे पोलीस उपनिरीक्षक, सर्जेराव पुजारी पोलीस उपनिरीक्षक, सहा फौजदार झेंडे, सहा फौज मोकाशी, पो. हवा. विठठल कदम, पो.हवा. बनसोडे, पो.हवा. मदने, पो. हवा. भापकर, पो.हवा कांरडे, पो.हवा. आणासाहेब देशमुख, पो. हवा संजय ढमाळ, म.पो.हवा रेणुका पवार, पो.ना.निलेश करे, पो.ना. सदीप भापकर, पो. कॉ. प्रविण शेडे, पो.कॉ. अमोल महाडीक, पो.कॉ निलेश जाधव पो कॉ संदीप पवार, पो.हवा. भरत आरडे, पो हवा विनोद हाके, तसेच मा.. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर याचे कार्यालयाकडील पो. हवा विशाल रासकर, पो.ना. सोमेश राउत, पो.हवा निलेश सटाले, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन शाख पुण ग्रामीण याचेकडील पो.स. ई. ननावरे, पो. हवा. काचन पो. कॉ धीरज जाधव, पो.हवा. कारंडे यांनी केली आहे.