पुरंदर
पुरंदर तालुक्यातील नायगाव या गावात सध्या एक फ्लेक्स चांगलाच झळकतोय.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नायगाव ग्रामपंचायत व सर्व सोसायटी संचालकांनी घेतला होता हा निर्णय घेण्याचे कारण देखील तसे लोकहिताचे होते.
“जानाई शीरसाई योजनेतून निवडणुकीच्या आधी पाणी न सोडल्यास बाजार समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु या निर्णयाची वाच्चता लोकप्रतिनिधी व संबंधित सोसायटीच्या सभासदांनी आपापल्या नेत्यापाशी खाजगीत केल्यावर पडद्याआड काय झाले कुणास ठाऊक परंतु गावचे सर्व नेतेमंडळींची भूमिका बदलताना दिसत आहे,व आता ते मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
पण पडद्याआड नेमकं काय घडले? असा प्रश्न सध्या नायगाव ग्रामस्थांना पडला आहे.