सासवड
पुरंदर तालुक्यामध्ये आज केलेल्या एकुण ५४२ संशयीत रुग्णांच्या तपासणीमध्ये तब्बल ५२ रुग्णांचा अहवाल हा कोरोणा पॉझीटीव आला आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये आज ३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.आज रोजी पुरंदर तालुक्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही ४३० इतकी आहे तर आजपर्यंत ९५६४५ इतके कोविड लसीकरण पुर्ण झालेले आहे.
शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पुरंदर तालुक्यामध्ये गरोदर मातांचे कोविड लसीकरण सुरु करण्यात आले असुन सर्व ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात असुन आजअखेर ६६ गरोदर मातांचे पहिल्या डोसचे कोविड लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले.