पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना अफूची शेती केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक

पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना अफूची शेती केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील यादववाडी येथे अफूच्या शेतीवर सासवड पोलिसांनी छापा टाकला आहे . पुरंदर तालुक्यातील यादव वाडी येथील महेश काशिनाथ यादव ग्रामपंचायत सदस्य सटलवाडी व भुजंग काशिनाथ यादव यांच्या शेतामध्ये सासवड पोलिसांनी धाड टाकून लाखो  रुपये किंमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त केल्याने संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे

सदर आरोपींविरोधात  (NDPS) अमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. 

सासवड  पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने सासवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  या कारवाईमध्ये तब्बल ४० ते ५० किलो अफुची बोंडे जप्त केली असून त्यापासून लाखो रुपयांचा तयार करण्याचा सदर आरोपींचा मानस असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

रात्री उशिरापर्यंत सासवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं यादव वाडी येथील गट नंबर १६८१ मध्ये हा अफुच्या  शेतीचा उद्योग आणि शेतीचा नवीन प्रयोग चालू होता हा सर्व प्रकार याठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास पोलीस करत आहे.

अजूनही काही माल  इतरत्र लपवून ठेवला आहे का याबाबत देखील पोलिसांचा तपास चालू आहे.  एकंदरीतच एका ग्रामपंचायत सदस्याला अशा पद्धतीने अटक झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *