पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामपंचायतीचा सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय निर्णय ; स्वातंत्र्यदिनी विधवा महिलेच्या हस्ते करणार ध्वजवंदन !!!!!

पुरंदर तालुक्यातील “या” ग्रामपंचायतीचा सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय निर्णय ; स्वातंत्र्यदिनी विधवा महिलेच्या हस्ते करणार ध्वजवंदन !!!!!

पुरंदर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पुरंदर तालुक्यातील पिसर्वे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी आज (ता. ८ ऑगस्ट) विशेष ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विधवा प्रथा मोडीत काढण्याचा व विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे. पिसर्वे गावाच्या लौकिकाला साजेसा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी ग्रामसभेनंतर बोलताना सांगितले.

पिसर्वे येथे आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये परंपरेने चालत आलेली अनिष्ठ विधवा प्रथा मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. ग्रामसभेत ‘आम्ही संवादी’ या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी उपस्थित गावकाऱ्यांसह महिलांना ही प्रथा बंद करण्यामागची कारणे व गरज याबाबत मार्गदर्शन केले.

विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडला. ग्रामपंचायात सदस्या योगिता कोलते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावत विधवा प्रथा मोडण्याच्या ठरावाला संमती दिली. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना गावातील ज्येष्ठ नेते श्रीरंग वायकर व ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू, बांगड्या आणि साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी सरपंच बाळासाहेब कोलते, उपसरपंच मीना कोलते, माजी उपसरपंच अरुणा कोलते, सदस्य रवींद्र कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, सुनील कोलते, सदस्या योगिता कोलते, कविता कोलते, सुषमा कटके, शीतल कोलते यांच्यासह ग्रामसेवक अमित टिळेकर आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

पिसर्वे ग्रामपंचायतीने आज सुवर्णाक्षरांनी लिहावा असा निर्णय घेतला आहे. रूढी परंपरेने चालत आलेली विधवा प्रथा आज आम्ही मोडीत काढली आहे. याचा एक महिला म्हणून मला अभिमान वाटतो, असे पिसर्वे ग्रामपंचायतीच्या सदस्या योगिता कोलते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *