माळशिरस
पुरंदर तालुक्याच्या पूर्वेस असणाऱ्या आंबळे गावात ग्रामपंचायत निधी मधून विविध विकास कामांचे भूमिपूजन सरपंच राजश्री थोरात व उपसरपंच मुक्ताबाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायतींच्या १५ टक्के निधीतून व पाणीपुरवठा निधीतून ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच मुक्ताबाई जगताप यांनी दिली.

यामध्ये प्रामुख्याने दरेकर मळा येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे,समाज मंदिर ते पाण्याची टाकी भूमिगत गटार योजना करणे,समाज मंदिराची सुधारणा करणे,अंगणवाडी येथील शाळेचे शौचालय दुरुस्ती करणे व वाश बेसीन पुरवणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप,सचिन दरेकर,मोहन कुंजीर, मधुकर ढोले,माजी सरपंच शशिकांत दरेकर,बाळासाहेब बधे,गुलाब जगताप,संजय जगताप,माजी सदस्या संजीवनी गायकवाड,नंदकुमार दरेकर, नामदेव थोरात,हंबीर जगताप,दिलीप जगताप,बाळासाहेब दरेकर,विजय जगताप,दिलीप जगताप,वसंत गायकवाड यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.