पुरंदर तालुक्यातील “या” गावात बनावट कागदपत्रांवरून महिलेची फसवणूक; विरोध केल्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल आठ लाखांची मागणी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात बनावट कागदपत्रांवरून महिलेची फसवणूक; विरोध केल्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल आठ लाखांची मागणी

पुणे

वडीलोपार्जित जमिनीची खोटी कागदपत्रे जोडुन बनावट दस्त करून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना सासवड येथे घडली आहे. महिलेने बनावट केलेला दस्त रद्द करण्याची विनंती केली असता तिच्या अंगावर पिस्तुल ताणुन 8 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सदर प्रकार हा 1 जानेवारी 2024 ते 11 जून 2025 या कालावधीत घडला असून सासवड पोलीस ठाण्यात एका वकिलासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुश्का सचिन जाधव (वय 36) व सचिन जाधव (वय 43) दोघेही राहणार सासवड, ता पुरंदर, जि पुणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वडिलोपार्जित मिळकतीवरील जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गट क्रमांक 1303 व 1313 मधील जमीन असल्याचा उल्लेख असताना नोंदणीकृत दस्तात 1396, 1304, 1322, 1324, 1346, 1357, 1372, 1404, 1415 या गटांचा समावेश करून बनावट व्यवहार करण्यात आला. त्यातून 8 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पिस्तूल दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींनी पिडीतेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांच्या स्त्री मनात लज्जा निर्माण होईल अशा पध्दतीने जाणीवपुर्वक स्पर्श करून व ढकलुन बाहेर काढले आहे. अशी पिडीतेने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *