पुरंदर
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एका सावत्र बापाने आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसानी दिलेली माहिती अशी की याबाबत मुलीची उस्मानाबाद जिल्ह्यातील व सध्या जेजुरी येथे राहणाऱ्या महिलेने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
तिने दिलेल्या फिर्यादी नुसार तीच्या दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे .
या बाबतचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे करीत आहेत.