पुरंदर तालुक्यातील “या”गावातील मुलानेच चोरले आईचे साडेदहा तोळे सोने !!!!!!        जेजुरी पोलिसांनी घेतले मुलाला ताब्यात

पुरंदर तालुक्यातील “या”गावातील मुलानेच चोरले आईचे साडेदहा तोळे सोने !!!!!! जेजुरी पोलिसांनी घेतले मुलाला ताब्यात

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील सुनिता होले यांच्या राहत्या घरातून १० तोळे ६ ग्राम ३५० मिली वजनाचे सोने किंमत अंदाजे ३ लक्ष १८ हजार ४५५ रुपये असा एवज चोरी गेला होता. ही चोरी होले यांच्या मुलानेच केल्याचा संशय व्यक्त झाला व तब्बल ३७ दिवसांनंतर जागा बदलून राहणार व मोबाईल घरीच ठेऊन गेलेल्या मुलाला जेजुरी पोलीसांनी शिताफीने बारामतीच्या सुपे येथून ताब्यात घेतले.

होले यांचा मुलगा सचिन होले याला चोरी प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर त्याला ३ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिले असता गुन्ह्याची कबुली देत, सोन कुठे लपवल्याचे सांगितले.

जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन गुरनं.३२७ / २०२१ भादवी कलम ३७९ प्रमाणे दिनांक १२ / १२ / २०२१ रोजी सौ. सुनिता वसंत होले रा. नायगाव ता. पुरंदर जि.पुणे यांचे फिर्यादीवरून जेजुरी पोलीस स्टेशनला दाखल झाला होता.

सदर गुन्हयात ०३,१८,४५५/- रुपयाचे १० तोळे ६ ग्रॅम ३५० मिली वजनाचे सोने चोरीस गेले बाबत फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा सचिन वसंत होले याचे विरोधात तकार दिली होती.

सदर गुन्हयातील आरोपी हा गुन्हा घडले पासुन फरार होता. गुन्हेशोध पथकाने घटनास्थळी जावुन भेट दिली असता, सदर गुन्हयातील आरोपी हा त्याचा मोबाईल घरी ठेवुन फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे हे जेजुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकासमोर मोठे अवाहन होते.

सदर घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयाचा तपास पुढे सुरू केला तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी हा पनवेल याठिकाणी गेल्याचे समजले त्यानंतर आरोपी हा वेळोवेळी आपल्या राहण्याचा ठिकाणा बदलत होता. त्यामुळे त्याला पकडणे खुप अवघड काम होते.

तांत्रीक माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपीस मोठया सिताफीने सुपे ता. बारामती येथुन भल्या रात्री अटक केली अटक केल्यानंतर त्यास मा.न्यायालयायने ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिले रिमांड मध्ये असताना त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, आरोपीने सदर गुन्हयात चोरी केलेले सोने कोठे लपवुन ठेवलेले ते काढुन देतो तुम्ही माझे सोबत चला असे सांगीतलेने गुन्हेशोध पथक आरोपीसह सदर ठिकाणी जावुन चोरी केलेले सोने पंचासमक्ष पचनामा करून ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड धनंजय पाटील, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तावसकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा फौजदार चंद्रकांत झेंडे, पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस नाईक गणेश कुतवळ पोलीस शिपाई प्रविण शेंई पोलीस शिपाई समिर हिरगुडे यांनी केली असुन गुन्हयाचा अधिक तपास सहा फौजदार झेंडे है करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *