पुरंदर तालुक्यातील निवडणुक झालेल्या “या” दोन्ही ग्रामपंचायतीत शिवतारे गटाने फडकविला झेंडा

पुरंदर तालुक्यातील निवडणुक झालेल्या “या” दोन्ही ग्रामपंचायतीत शिवतारे गटाने फडकविला झेंडा

पुरंदर

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुरंदर तालुक्यात सिंगापूर व बहिरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली आहे. 

सिंगापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेने सातपैकी पाच जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेस राष्ट्रवादी दोघेही एक होऊन त्यांना अवघ्या दोन जागा मिळाल्या. बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा मिळवून सेनेने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

याबाबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि शाखाप्रमुख विक्रांत पवार म्हणाले, स्वर्गीय शंकरराव उरसळ यांच्या आशीर्वादाने आम्हाला ग्रामपंचायत मध्ये एवढे घवघवीत यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सासवड येथील सभेनंतर जनतेने दिलेली ही पहिली सकारात्मक प्रतिक्रिया आहे. आमदार नसलो तरी आगामी काळात पुरंदर हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार असल्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *