पुरंदर
महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम (१) कलम 58 (१) अ प्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग जिल्हा (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवायच्या जागा उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करायचे आहेत.
त्याकरिता आरक्षण निश्चित करणे करता सोडत दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती पुरंदर येथील श्री. छत्रपती संभाजी महाराज सभागृह, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे होणार आहे तरी पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.