सासवड (ता पुरंदर) येथे भाजप सासवड शहर उपाध्यक्ष अमोल जगताप (रा.सासवड ता पुरंदर) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे दोन हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडावर वार केल्याचे समजते.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालय सासवड दाखल केले आहे याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान अमोल जगताप शुक्रवार (दि.२) सकाळी ११ च्या सुमारास काही कामानिमित्त जयप्रकाश चौकातून मुख्य बाजारपेठेत जात असताना त्याच्या गाडीला दोन हल्लेखोरांनी धडक दिली.
त्यांच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करून लाथा व बुक्क्यांचा मार दिला यात ते गंभीर जखमी झाले तेथून दोन हल्लेखोर पसार झाले घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले तसेच अमोल जगताप यांनी ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दाखल केले या प्रकारामुळे सामन्य माणसाला असुरक्षिततेची भावना निर्माण होते.