पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना !!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात चार दिवसापासुन बेपत्ता असणार्या भावाचा विहीरीत सापडला मृतदेह

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना !!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात चार दिवसापासुन बेपत्ता असणार्या भावाचा विहीरीत सापडला मृतदेह

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे . कोडीत येथे चार दिवसांपासून बेपत्ता  मेंढपाळ तरुणाचा  मृतदेह कोडीत गावातील विहिरीत सापडला आहे . मयत तरुणाचे नाव आनंद रावा कोकरे वय 21 वर्षे मुळ रा.दिवे  ता. पुरंदर जि.पुणे, सध्या रा. कोडीत ता. पुरंदर जि.पुणे असे आहे .

सदर मयत तरुणाचा भाऊ  संतोष रावा कोकरे वय 25वर्षे व्यवसाय मेंढपाळ मुळ रा.दिवे  ता. पुरंदर जि.पुणे, सध्या रा. कोडीत ता. पुरंदर याने  दि . १९ मे रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार सासवड पोलिसात दाखल केली होती त्यांनंतर आज दि. २२ रोजी  तरुणाचे चुलते कामाजी पांगारूनाथ कोकरे रा. दिवे ता. पुरंदर जि.पुणे, यांनी सासवड पोलीस ठाण्यात  तरुण मयत झाल्याची फिर्याद दाखल केली आहे . 

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणाचा भाऊ संतोष रावा कोकरे याने दिलेल्या फिर्यादी नुसार  दि .१९ मे २०२२  रोजी रात्री ९ वा .चे सुमा. मौजे कोडीत ता. पुरंदर जि.पुणे येथुन फिर्यादी व मयत  आनंद कोकरे असे दोघे दिवसभर बकरी चारुन सायं  ७  वा. चे सुमा. घरी आले  त्यानंतर ,आनंद कोकरे जेवन करुन तेथेच शेजारी असलेल्या  बक-यामध्ये गेला.

रात्री ८ . ३० वा.चे सुमा. दत्ता काळु ठोंबरे रा. रिसे पिसे ता.पुरंदर जि.पुणे सध्या रा. कोडीत ता.पुरंदर जि.पुणे हा तेथे आला व मोबाईल चार्जींग करुन येवु असे म्हणुन त्याने मयत आनंद कोकरे यांस  त्याचेसोबत चालत नेले. रात्री  ९ वा . चे सुमारास दत्ता काळु ठोंबरे हा एकटाच माघारी आला असता तेव्हा संतोष  कोकरे  याने त्याला माझा भाऊ याबद्दल विचारले असता त्याने तो पाठीमागे आहे, तो मागुन येत आहे. असे सांगीतले.

त्यानंतर  संतोष  लगेच   भावाला फोन लावला असता त्याचा फोन स्वीच आँफ लागत होता.  त्यानंतर  सर्वानी मिळुन त्याचा कोडीत व परिसरात शोध घेतला तसेच त्याची नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो मिळुन आला नाही.

म्हणुन संतोषची आपला  भाऊ आनंद  बेपत्ता झालेची खात्री झाली त्याने याबाबतीत सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली  होती सासवडचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. न . गणेश पोटे हे याचा कसून तपास करीत होते . 

आज दि. २२ मे रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मयत तरुणाचे चुलते कामाजी कोकरे यांना त्यांचे चुलत भाऊ अंकुश कोकरे यांचा फोन आला आनंद रावा कोकरे हा मयत झाला असून कोडीत येथे एका विहिरीत त्याचे प्रेत सापडले आहे. 

सदर घटनेने संपूर्ण पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली असून मयत तरुणाचा खून ,आत्महत्या की अपघात याबाबतीत चर्चेला उधाण आले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना . गणेश पोटे हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *