पुरंदर
दिवे (ता. पुरंदर) येथे मुक्ताबाई गोकुळ भापकर राहणार भापकर मळा दिवे येथे बरेच दिवस झाले रहिवासी असून, त्यांना संतोष गोकुळ भापकर हा मुलगा असून, सून मोहिनी, नातवंडे साक्षी ,अनुष्का, प्रज्वल तसेच लहान मुलगा योगेश ,सून पूनम, नातू प्रणव हे सर्वजण जेजुरी येथे राहण्यास असून, तेथे श्री दत्त भेळ नावाचे हॉटेल आहे ,ते चालवून ते त्यांची कुटुंबाची उपजीविका करत आहे.
तर दोन एकर शेती दिवे येथे असून,संतोष हा शेती करतो. संतोषला दारूचे व्यसन आहे.तो नेहमी आपल्या आई-वडिलांना बोलत आहे की, दोन एकर शेती माझ्या नावावर करा, असे म्हणून दारू पिऊन येऊन मारहाण करत आहे.शिवीगाळ दमदाटी करत आहे.भाजीपाला आम्हाला आई-वडिलांना आणून देत नाही अशा अवस्थेत उपाशी ठेवत आहे.
माझ्या नातवंडांना सुद्धा कारण नसताना मारहाण करत आहे. एक ऑक्टोंबर 2024 ला संतोष दारू पिऊन येऊन वडिलांना शेतजमीन नावावर करून द्या ,नाहीतर जीव मारून टाकीन ,अशी धमकी ,शिवीगाळ करत आहे. त्यावेळी त्याला सोडवण्यासाठी गेले असता ,आईला सुद्धा हाताने ,लाकडी दांडक्याने मारहाण केली.
यावेळी नातवंडे, सून ,सुद्धा सोडवण्यासाठी आले असता ,त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यामुळे अशा स्थितीत घरातून बाहेर आम्हाला काढले .हाकलून दिले .त्यामुळे भापकर यांनी सासवड पोलीस स्टेशनची सविस्तर तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल पोलीस हवालदार कांबळे अभिजीत यांनी दाखल करून घेतली.
पुढील तपास पोलीस हवालदार लाटणे सुहास व सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत.