पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उपाध्यक्षपदी पल्लवी दरेकर तर सरचीटणीस पदी प्रियांका जगताप

पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस उपाध्यक्षपदी पल्लवी दरेकर तर सरचीटणीस पदी प्रियांका जगताप

पुरंदर

पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी आंबळे येथील पल्लवी सचीन दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच तालुका युवती कॉंग्रेसच्या सरचीटणीस पदी प्रियांका सुमित जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व युवती कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रियाताई सुळे तसेच प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर व पुरंदर तालुका महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे विचार हे सर्वसामान्य युवतींपर्यंत पोहोचवुन पक्षसंघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचीत पदाधिकार्यांनी सांगीतले.

यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर,पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस अध्यक्षा सोनाली खेड़ेकर तसेच असंख्य युवती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *