पुरंदर चा हा “पोपट” भर सभेत थोबाडात चप्पल खाणार का? (नाव न घेता “यांना” इशारा) ; संपुर्ण पुरंदर तालुक्याचे लागले लक्ष

पुरंदर चा हा “पोपट” भर सभेत थोबाडात चप्पल खाणार का? (नाव न घेता “यांना” इशारा) ; संपुर्ण पुरंदर तालुक्याचे लागले लक्ष

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील बहुचरचेत असलेले छत्रपती संभाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून या विमानतळाच्या साठी तयार झालेली संघर्ष समिती आक्रमक झाली असल्याचे पहावयास मिळते.

महिलांच्या वतीने “विमानतळाच्या नावाखाली गल्लीबोळात भुंकणारा पोपट लवकरच भर सभेत थोबाडात चप्पल खाणार” अशा प्रकारचे स्टिकर सध्या सोशल मीडियावर झळकत आहेत.

यामुळे विमानतळ संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली असल्याचे सध्या पाहावयास मिळते. तालुक्यातील एक माजी राज्यमंत्री यांनी विमानतळ होणार असल्याचे जाहीर केले आहे. व त्यांच्याकडून प्रत्येक सभेमध्ये विमानतळावर भर दिला जात आहे.

यामुळे कोणाचे हे नाव न घेता पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत असल्याने वेगळे चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सभेत चप्पल कोण खाणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे खरंच हा नेता सभेत चप्पल खाणार का?

सध्या सरकारमध्ये असलेल्या आमदारांना देखील जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे यातच आमदार संतोष बांगर यांचे प्रकरण ताजे आहे यामुळे माजी आमदारांची व नेत्यांची सुरक्षितता वाढवावी लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *