पुरंदर
स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान यांच्या संलग्न चॅम्पियन्स मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या खेळाडूंची क्यू-बेल्ट परीक्षा कुंजीरवाडा सासवड येथे घेण्यात आली. या परीक्षेसाठी अकॅडमी मधील १७५ खेळाडू सहभागी झाले होते. या परीक्षेमध्ये १६ खेळाडूंना गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यासाठी मा. डॉ. दिगंबर दुर्गाडे – अध्यक्ष पी. डी. सी. सी. बँक, मा. सुदामआप्पा इंगळे- आदर्श जिल्हा परिषद सदस्य, मा. इस्माईल सय्यद – प्राचार्य पुरंदर ज्युनिअर कॉलेज, मा. संतोषकाका जगताप -अध्यक्ष एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड, मा. शहाजी गरुड – सचिव एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड, मा. गणेशदादा बोराटे वरिष्ठ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्र. ४४ हडपसर, मा. राहुल नागरगोजे – विश्वस्त एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड इ. मान्यवर उपस्थित होते. मा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळाडू किती कणखर आहेत व त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे याची जाणीव करून दिली.
तसेच त्यांनी ध्येय मोठे ठेऊन त्या दिशेने वाटचाल करावी यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच मा. सुदामआप्पा इंगळे यांनी खेळाडूंचे कौतुक करताना पुरंदरचा येणार भविष्यकाळ चांगला आहे असे मत व्यक्त केले. तसेच इतर मान्यवरांनीही खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
हि परीक्षा घेण्यासाठी परीक्षक हेमंत डोईफोडे सर व रामप्रसाद सोनुने सर उपस्थित होते. हे सर्व खेळाडू शिहान -प्रदीप वाघोले, सेन्साई- तेजस वाघोले, सेन्साई – ललित वाघोले, आकाश कुदळे, श्वेता फडतरे व पूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.