पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील खंडोबानगर झोपडपट्टी याठिकाणी गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विनय झिंझुरके,पोलिस अंमलदार गणेश पोटे, निलेश जाधव,जब्बार सय्यद,लियाकत अली मुजावर व तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्याठिकाणी छापा टाकला.
त्याठिकाणी प्रशांत उर्फ गणेश पासलकर हा एक स्टीलचा डब्बा व प्लँस्टीक पिशव्या घेऊन बसला होता. त्या डब्यात व पिशवीत गांजा भरलेला मिळाला. तसेच त्याची झाडाझडती केली असता त्याच्याजवळुन २०५२०/- रोख रक्कम तसेच गांजा विक्रीसाठी वापरत असलेली मारुती सुझुकी आल्टो चारचाकी गाडी मिळाली तसेच त्या गाडीत ४.२३४ किलो वजनाचा गांजा मिळाला त्याची किंमत ६३१५०/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,पोलिस उपनिरीक्षक विनय झिंझुर्के,पोलिस अंमलदार गणेश पोटे,निलेश जाधव,जब्बार सय्यद,सुहास लाटणे,लियाकतअली मुजावर,संजयकुमार दाणे,पोलिस अंमलदार कोमल शेटे यांचे पथकाने केली आहे.