पुरंदर
समाजातील विधवा, परितक्त्या, एकल महिलांना सुवासिनींचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, याच भावनेतून परिंचे ग्रामपंचायत यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभास महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.या प्रसंगी गावातील विधवा, परितक्त्या, एकल महिलांना हळदी कुंकू सह ऋतुजा जाधव यांनी सन्मानपूर्वक वाण वाटप केल्याने महिला हरखून गेल्या.
परिंचे ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ.संजय रावळ यांनी उपस्थित महिलांना आरोग्याची तपासणी, आरोग्य विमा, सकस आहार, गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी यांचे महत्व पटवून दिले.
हळदी कुंकू कार्यक्रमात विधवा, परितक्त्या, एकल महिलांची कुचंबणा होते. समाजातील बुरसटलेले विचार खोडून काढून परंपरेला छेद देण्यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकल महिलांचा वाण देऊन सन्मान करण्यात आला. संसाराचा गाडा ओढणाऱ्या एकल महिलांना मुख्य प्रवाहात सामावून घेतल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या क्रांतिकारी निर्णयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली – ऋतुजा धैर्यशील जाधव , सरपंच परिंचे
महिलांसाठी नजीकच्या काळात विविध आरोग्य तपासण्या मोफत करणार असून सर्वच महिलांनी स्वतःचे ई श्रम कार्ड ग्रामपंचायतीत काढून घ्यावे असे आवाहन ऋतुजा जाधव यांनी केले.
हळदी कुंकू समारंभात वाण म्हणून प्रत्येक उपस्थित महिलेस ३ पिण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.या प्रसंगी डॉ. संजय रावळ, सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत,ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता नाईकनवरे, वंदना राऊत, अर्चना राऊत, गणेश पारखी, अजित नवले, गुणशेखर जाधव, माजी उपसरपंच मनीषा जाधव,सुप्रभा जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत,तनुश्री जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.