नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण ! तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
पुणे (प्रतिनिधी )
पुणे -पंढरपुर पालखी मार्गावरिल वडकीनाला ,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरात आठ दिवसात तीन बिबट्यांनी तीस कोंबड्या,चार कुञी,दोन शेळ्या फस्त केल्या आहेत.
एका गायवर जीवघेणा हल्ला केला आहे. वडकी नाला,कानिफनाथ गड डोंगर माथा ते दिवे घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकसान ग्रस्त भागात तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे. कानिफनाथ गडावर दर्शनासाठी ये -जा करणार्या भक्तांमध्ये सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे.वडकीनाला परिसरात राहणार्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडकीनाला परिसरात येत्या एक -दोन दिवसात बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास ग्रामस्थांवर ही हल्ला होण्याची शक्यता आहे .पुणे वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वडकी गाव येथील स्थानिक रहिवाशी नवनाथ फडतरे यांनी केली आहे.