पुरंदर
गेला महिनाभर पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजेवाडी आंबळे परिसरात पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच आज दुपारी राजेवाडी,आंबळे परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली यामध्ये शेतीच्या कामाचा खोळंबा झाला.
राजेवाडी परिसरातील फुल शेती, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या आठवडाभरापासून पावसाने थोडी उघडीप दिली होती मात्र आज झालेल्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करून अतिवृष्टीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार रूपाली सरनोबत यांना आदेश दिले होते.
त्यानुसार अतिवृष्टीच्या नुकसानीचे नुसते पंचनामे झाले आहेत मात्र नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत अनेकांनी बँकांकडून कर्ज काढून तसेच हात उसने तसेच दुकानदारांकडून उधारीवर खते बी बियाणे खरेदी केले होते.
मात्र शेतकऱ्यांना सध्या पावसाने हातबल केले असून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार हे निश्चित झाले आहे शासनाने तातडीने मदत करावी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे