पुणे
पोपटाच्या वारंवार शिट्टी वाजवणे आणि मिठू मिठू बोलण्यामुळे त्याचा मालक अडचणीत आल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटना पुण्यात घडली आहे. शेजारी असलेला पोपट वारंवार शिट्टी मारत असल्यामुळे पोपटाच्या मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोपटाच्या शिट्टीच्या त्रासामुळे पोपटाच्या मालकाविरोधात पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शिंदे (वय 72) आणि अकबर अमजद खान हे पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. अकबर अमजद खान यांच्या पोपटाच्या शिट्टीच्या त्रासामुळे सुरेश शिंदे यांच्यात नेहमी भांडण व्हायची.
पोपटाच्या शिट्टीच्या त्रासामुळे शिंदे आणि खान यांच्यात गेल्या शुक्रवारी कडाक्याची भांडणे झाली, त्यानंत शिंदे यांनी अकबर अमजद खान यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शिंदे (वय 72) आणि अकबर अमजद खान हे पुण्यात समोरासमोर राहण्यास आहे. अकबर अमजद खान यांनी एक पोपट पाळला आहे. त्यांचा पोपट हा सारखा ओरडत असतो. तसेच पोपट वारंवार शिट्टी वाजवत असतो. पोपटाच्या शिट्टीच्या आवाजामुळे शेजारी राहत असलेले जेष्ठ नागरिक सुरेश शिंदे हे त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे शिंदे यांनी अनेकदा खान यांना गेल्या शुक्रवारी पोपट कुठेतरी ठेवा असे म्हणाले. त्यानंतर दोघांमध्ये पोपटाच्या शिट्टीवरून जोरदार भांडणे झाली. या भांडणावेळी खान यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिंदे यांनी पोलिसांत जाऊन केली. शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोपटाच्या मालकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.