पुणे
पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे.
एका इमारतीच्या ७ व्या मजल्यावर हे हॉटेल असल्याने आगीचे लोण पसरत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील कोंढाव्यातल्या लुल्लानगर चौक परिसरात ही प्रसिद्ध हॉटेल आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हॉटेलमधील वरच्या मजल्यांवरून धूर निघत असल्याचं निवासी नागरिकांना दिसलं.
क्षणार्धातच या आगीने रौद्ररुपधारक केलं. आग इतकी भीषण आहे की आगीचे लोळ दुरपर्यंत दिसून येत आहे. दरम्यान, आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोटही झाले असल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.