पुण्यातील तरुणीला आईच्या Relationshipचा लागला सुगावा; बॉयफ्रेंडच्या मदतीनं उकळले लाखो रुपये

पुण्यातील तरुणीला आईच्या Relationshipचा लागला सुगावा; बॉयफ्रेंडच्या मदतीनं उकळले लाखो रुपये

पुणे

पुण्यातील एका 21 वर्षीय तरुणीनं आपल्या आईचे प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचं आपल्या आईसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा सुगावा लागल्यानंतर आरोपी तरुणीनं आपल्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक केलं आहे. यानंतर आईचे आणि तिच्या प्रियकराचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागणी केली होती. पण आईच्या प्रियकरानं पोलिसांत तक्रार दिल्यानं मुलीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार व्यक्तीचे आरोपी तरुणीच्या 40 वर्षीय आईसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही दिवसांनी आरोपी तरुणीला याचा सुगावा लागला. आपल्या आईचं परपुरुषासोबतचं प्रेम प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मुलीनं स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप हॅक केलं. त्यावेळी तिला दोघांत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. सोबतच तिला आपल्या आईचे प्रियकरासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील मिळाले.

हेच फोटो आणि व्हिडीओ आरोपी तरुणीनं आपला प्रियकर मिथुन गायकवाड (वय-29) याला दाखवले. येथूनच खंडणीचा प्रकार सुरू झाला. आरोपींनी तक्रारदार व्यक्तीला संपर्क साधून, दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच बदनामी टाळायची असेल तर पंधरा लाख रुपये द्या, अशी मागणी आरोपींनी केली. दबावाला बळी पडून तक्रारदारानं 2 लाख 60 हजार रुपये इतकी रक्कम आरोपींना वेळोवेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *